You are currently viewing वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांनी ३ नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत

वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांनी ३ नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी

अनुदान योजनेचा लाभ घेणारे वस्त्रोद्योग आणि 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य सर्व वस्त्रोद्योग प्रकल्प ज्यांची वीज सवलत सुरु आहे. त्याच प्रमाणे वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करीत असलेले वस्त्रोद्योग प्रकल्पांनी 22 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यवाही करावी. त्यासाठी 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावेतअसे आवाहन         वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केले आहे.

            ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत सुरु असेल किंवा बंद आहे. अथवा वीज सवलत मागणीसाठी प्रस्ताव सादर करीत आहे. त्या उद्योगांनी शासन निर्णयसहकार पणनव वस्त्रोद्योग विभाग 22 ऑक्टोंबर 2021 शासन निर्णयातील परिशिष्टानुसार प्रस्ताव आयुक्त (वस्त्रेाद्योग) यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. प्रस्ताव मागील 6 महिन्याचे वीज देयक तसेच प्रकल्पाचा एकूण वीज वापर जसे औद्योगिककामगारवसाहत त्यांचे कार्यालय व अन्य वापर यांच्या माहिती तसेच त्यासाठीच्या वीज मिटर याची माहिती देखील सादर करावी.

         ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत नियमित सुरु आहे त्या प्रकल्पांना प्रस्ताव सादर करण्यासाठी शासन निर्णयानुसार 10 दिवसाची मुदत देण्यात येत आहे. सदर प्रकल्पांनी 3 नोव्हेंबर 2021 पर्यत प्रस्ताव सादर करावा. या मुदतीत ज्या प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त होणार नाहीत त्यांची वीज सवलत बंद करण्यात येईल. तसेच सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या प्रस्तावांची सखोल तपासणी केल्यानंतर शासनाच्या मान्यतेने सदर प्रकल्पांना वीज लागू करण्यात येईल. शासन निर्णयात दिलेल्या सुचनानुसार शासनास प्राप्त होणाऱ्या वीज सवलतींच्या प्रस्तावात प्रकल्पांनी सादर केलेली माहिती तसेच प्रकल्पात प्रत्यक्षात असलेली माहिती तीच आहे किंवा कसे याची विभागाच्या दक्षता व नियंत्रण पथकाकडून नियमित तपासणी करण्यात येईल. जर पथकाच्या तपासणीत निदर्शनात आले कीप्रकल्पाने सादर केलेली माहिती तसेच प्रत्यक्षात असलेली माहिती यामध्ये तफावत आहे किंवा प्रकल्पाने चुकीची अथवा खोटी माहिती सादर केली आहे. तर त्या प्रकल्पाची वीज सवलत तसेच अन्य सवलती तात्काळ बंद करण्यात येतील.  तसेच यापूर्वी दिलेल्या सर्व अनुदानाची व्याजासह वसुली करण्यात येईल.

         ज्या प्रकल्पांनी शासन निर्णसोबतच्या परिशिष्टाप्रमाणे नमूद केलेल्या माहितीपैकी जी माहिती यापूर्वी सादर केलेली आहे. ती माहिती वगळून उर्वरित माहिती सादर करावी. तसेच ज्या प्रकल्पांनी वीज सवलत स्वघोषणापत्र न सादर केल्यामुळे बंद आहे व त्यांनी प्रस्ताव सादर केलेला नाहीत त्यांनी देखील त्वरीत प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन  वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती तेली- उगले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा