You are currently viewing प्रकाश गवस यांच्या रूपाने घडले खाकितल्या देवदूताचे दर्शन….

प्रकाश गवस यांच्या रूपाने घडले खाकितल्या देवदूताचे दर्शन….

कुडाळ

वाहतूक पोलीस हवालदार प्रकाश गवस यांच्या रुपाने आज दिसला खाकीतला देवदूत. गवस यांनी कुडाळ येथील अपघातग्रस्त युवकाला उपचारासाठी इस्पितळात दाखल केले. जिल्हा वाहतूक शाखेतील हवालदार प्रकाश गवस वेंगुर्ला येते आपल्या ड्युटी वर जात होते. कुडाळ काळप नाक्यावर हायवे फ्लायओव्हर वर युवकाचा अपघात होऊन तो जखमी अवस्थेत पडला होता. सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात घडला होता. फ्लाय ओव्हर ला पडलेल्या खड्ड्यात एक्टिवा जाऊन घावनळे गावातील चैतन्य सुकी हा युवक अपघातात जखमी होऊन रस्त्यावर पडलेला होता. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न येऊन या खड्ड्यात एक्टिवा गेल्यामुळे हा अपघात झाला होता. या अपघातात चैतन्य चा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. जखमी अवस्थेत तो विव्हळत रस्त्यावर पडलेला होता. त्याच दरम्यान कणकवलीहून वेंगुर्ल्याच्या दिशेने जाणारे वाहतूक पोलिस प्रकाश गवस यांच्या निदर्शनास ही घटना आली. गवस यांनी तात्काळ खाजगी फोर व्हिलर थांबून चैतन्याला कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. केवळ ट्राफिक कंट्रोलींगच नव्हे तर अपघातग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे हवालदार प्रकाश गवस यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. भर पावसात अपघातावेळी मदतीला धावून आलेल्या हवालदार गवस यांचे चैतन्य ने अश्रू भरल्या डोळ्यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा