You are currently viewing केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक –  परशुराम उपरकर 

केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक –  परशुराम उपरकर 

कणकवली

जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जाब विचारण्याची गरज आहे. जनतेला दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत. केंद्रात आलेल्या सत्ताधाऱ्यांनी “अच्छे दिन लायेंगे” महागाई कम करेंगे ..अशी घोषणा देत सत्तेवर आले. त्याउलट पेट्रोल, डिझेल व गॅसची प्रचंड प्रमाणात महागाई केली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित कोडमडले आहे. त्याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळेच आपण निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जनतेने जाब विचारला पाहिजे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी लोकांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

परशुराम उपरकर म्हणाले, केंद्राने गेल्या सात वर्षात नोटबंदी व अन्य केलेल्या उपाययोजना असफल ठरल्या आहेत. त्याचे परिणाम आता सुरु झाले असून सर्वसामान्य जनता होरपली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विदर्भ, मराठवाडा प्रमाणे आत्महत्या ट्रेंड सुरु झाला आहे. त्याचा विचार जिल्ह्यातील सत्ताधारी लोकांनी केला पाहिजे. जिल्ह्यातील १५०० लोकांचे प्राण कोविड मुळे गेलेत. त्याला सत्ताधारी जबाबदार आहेत. शासनाकडे पैसे नसताना मोठमोठ्या घोषणा करतात. त्यामुळेच शिवसेना व कॉग्रेस लोक आंदोलनाची भाषा करताहेत, असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला. सध्या राज्यात वानखेडे प्रकरण किंवा अन्य घटना घडवून जनतेचे लक्ष विचलित करुन महागाई व विकासापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.शेती नुकसान व तोक्ते वादळाची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही.जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी सत्ताधारी अपयशी ठरले आहेत.कुडाळ महिला रुग्णालय गेली ७ वर्षे रखडले आहे.मेडिकल कॉलेजचे लॉलीपॉप दाखवून मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल दाबण्याचा पर्यंत केला आहे. जनतेने निवडणूक आल्यावर दारावर लोकप्रतिनिधी आल्यावर जाब विचारला पाहिजे.७ वर्षातील घोषणा व झालेली विकासकामे पाहता विकास झालाच नाही.केवळ घोषणा ठरल्या आहेत,असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा