You are currently viewing पिंगुळी कुडाळ ठाकर आदिवासी कला आंगण येथे पर्यटन कार्यशाळा

पिंगुळी कुडाळ ठाकर आदिवासी कला आंगण येथे पर्यटन कार्यशाळा

पिंगुळी :

पर्यटन संचालनालय (DOT) महाराष्ट्र व प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई आणि
ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय, आयोजित पर्यटन कार्यशाळा दि. 22 ऑक्टोबर 2021 रोजी ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी येथे घेणेत आली.कोकणातील कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी आणि हॉटेल रिसॉर्ट यांना औद्योगिक दर्जाची नोदणी कार्यपद्धती आणि त्याचे फायदे तसेच इतर पर्यटन योजना बाबत माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला श्री. हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे TAKA कोकण कल्चर पार्क कृषी पर्यटन केंद्र श्री. मनोज हाडवळे पर्यटन प्रशिक्षक पर्यटन संचालनालय यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे उद्द्घाटन श्री. हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई तसेच अन्य मान्यवर यांचे उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.

सिंधुदूर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असुन निसर्ग संपन्न आहे. पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन पर्यटनाच्या योजना याची सविस्तर माहिती श्री. हेडे उपसंचालक यांनी यावेळी दिली. तसेच साहसी पर्यटन कृषी पर्यटन या महाराष्ट्र शासनाच्या नविन योजनांची माहिती दिली.

शासनाच्या या योजनांमध्ये लोकसहभाग महत्वाचा असुन अशा पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री हनुमंत हेडे यांनी सांगितले. तसेच रिसॉर्ट न्याहरि निवास योजना कृषी पर्यटन निवास या ची माहिती तसेच पर्यटकांना पुरविण्यात येणा-या सुविधांची माहिती हि या वेळी उपस्थितांना देण्यात आली.


पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी यावेळी TAKA कृषी पर्यटन केंद्राची माहिती यावेळी देण्यात आली. श्री गंगावणे यांनी यावेळी ठाकर आदिवासी कला आंगण या संग्रहालयाची माहिती तसेच या संग्रहायला भेट देणा-या देश विदेशातील पर्यटकांचा अनुभव हि उपस्थितांना सांगितला. या वेळी श्री गंगावणे यांनी 30 वर्षा पूर्वी घरी भेट दिलेल्या अमेरिका येथिल पर्यटकांची माहिती दिली. अमेरिका मधील पर्यटकांनी यावेळी घरिच राहुन जेवणाचा आस्वाद घेतला तसेच येथिल लोककला अनुभवल्या असे श्री. गंगावणे यांनी सांगितले. आज हि देश विदेशातुन पर्यटक संग्रहालयाला भेटी देत आहेत असे सांगितले. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पर्यटक व्यावसायिकांनी उत्तम सेवा पर्यटकांना दिल्यास ख-या अर्थाने पर्यटन जिल्हा आपला होईल यात शंका नाहि असे म्हटले.


श्री मनोज हाडवळे पर्यटन प्रशिक्षक यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पर्यटन योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. जुन्नर पुणे येथिल पराशर टुरिझम कृषी पर्यटनाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच आपल्या येथे असणारे ग्रामिण पर्यटन कशा प्रकारे पर्यटकांना दाखविले जाते याची माहिती उपस्थितांना दिली. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पर्यटन हे एक प्रकारचे संपूर्ण महाराष्ट्र साठी रोल मॉडेल आहे असे हि त्यांनी सांगितले. यावेळी श्री चेतन गंगावणे यांना ऑनलाइन घेतलेल्या कृषी पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रमाणपत्र यावेळी श्री. हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई यांच्या हस्ते देण्यात आले. उपस्थितांनी यावेळी आपल्याला पर्यटन क्षेत्रात येणा-या अ‍डचणी मांडल्या यावर मान्यवरांनी त्यावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस श्री चंद्रशेखर उपरकर, श्री संजय नाईक,श्रीमती अनुजा तेंडोलकर,श्री एकनाथ हिर्लेकर, श्री. मोहन होडावडेकर, श्री. संतोष राणे,श्री दादा सामंत,श्री मिलिंद पाटिल ,श्री अनंत सावंत मामाचा गाव,श्री संदिप बिर्जे श्री ज्ञानदेव गुरव तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात काम करणारे तसेच या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असे मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा