सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश हुकलेले आहे, अशा इच्छुक उमेदवारांना रिक्त जागेवर प्रवेशासाठी नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याची संधी प्रशिक्षण महासंचालनालयांनी उपलब्ध करुन दिलेली आहे. उमेदवारांनी २६ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत itiadmissions@dvet.gv.in किंवा www.dvet.gov.in या अधिकृत संकेस्थळावर जाऊन अर्ज करावित. असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (म.रा) संचालक दि.अ. दळवी यांनी केलेली आहे.
अर्ज केलेल्या इच्छूक उमेदवारांची गुणवत्ता यादी २७ ऑक्टोंबर २०२१ रोजी संबंधित संस्थेत स्थळावर लावण्यात येईल. दि२८ ऑक्टोंबर पासून रिक्त राहिलेल्या जागेसाठी समुपदेशन प्रवेश फेरी सुरु होईल. संकेतस्थळावर सूचित केलेल्या नोटीफिकेशन प्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात यंणार आहे. शिल्प कारागीर योजना, आदिवासी उपाययोजना , अल्पसंख्याक योजना, सार्वत्रिक योजना, अनुसूचित जाती संबंधित आदी योजनांच्या अंतर्गत ज्या जागा रिक्त आहे त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी ही शेवटची संधी संचालनालयाने उपलब्ध करुन दिलेली आहे. अलिकडे मोठमोठ्या औद्योगिक आस्थापनात आय.टी.आय. व्यवसाय प्रमाणपत्र धारकांना मोठी मागणी वाढलेली आहे.
समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करुन या प्रवेश फेरीचा इच्छुक उमेदवारांनी आवश्यक लाभ घ्यावा, औ.प्र.संस्थेच्या प्रवेशसाठीची ही संस्थास्तरावरची शेवटची संधी असल्याने प्रवेशासाठी इच्छुक अमेदवारांनी या संधीचा लाभ आवश्यक लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जवळच्या औ.प्र.संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (म.रा) संचालयक दि.अ.दळवी यांनी केलेले आहे