You are currently viewing देवगडात केंद्रीय मंत्री राणे यांनी मंजूर केलेल्या मासळी प्रोजेक्टच्या जागेची केंद्रीय समितीकडून पहाणी

देवगडात केंद्रीय मंत्री राणे यांनी मंजूर केलेल्या मासळी प्रोजेक्टच्या जागेची केंद्रीय समितीकडून पहाणी

देवगड

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या माध्यमातून खात्याअंतर्गत देवगड येथे मासळी सुकविण्यासाठी प्रकल्प मंजूर केला आहे. देवगड मधील देवदुर्ग फिशरमन,देवगड फिशरमन व तारामुंबरी फिशरमन या तिन्ही मच्छीमार संस्थांच्या माध्यमातून देवगडमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.या प्रकल्पाबाबतची माहिती व जागेची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने रविवारी देवगड येथे येत मच्छिमार सोसायटीच्या पदाधिकारी यांचेशी शासकीय विश्रामगृह येथे सविस्तर चर्चा केली.
या प्रकल्पासाठी पाच कोटी मंजूर झाले असून प्रकल्पाची माहिती केंद्रीय समितीने देवगड येथील मच्छिमार सोसायट्याच्या पदाधिकारी यांना समजून दिली.देवगडच्या सुक्या मासळीला देवगड या विशेष ब्रँड म्हणून ओळख मिळावी.यासाठी मंत्री राणे यांचे प्रयत्नशील आहेत.सोलर पद्धतीच्या माध्यमातून मशीनद्वारे जलद गतीने मासळी सुकविणेची प्रक्रिया या प्रकल्पात होणार आहे. या प्रकल्पाबाबतची प्राथमिक माहिती दिली.

स्थानिक तिन्ही सोसायटीनी मिळून रजिस्टर केल्यानंतरचं हा प्रकल्प होणार आहे.येथील स्थानिक सुके मासळी विक्रेत्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.यावेळी एमएसएमईचे टेक्निकल ऑफिसर स्वपन सिद्धार्थ, सागर मित्र मंडळाचे अक्षय महाडिक,अभिषेक तेंडोलकर,मत्स्यपरवाना अधिकारी रवींद्र मालवणकर,नगराध्यक्षा प्रियंका साळसकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे,नगरसेवक योगेश चांदोसकर,उमेश कनेरकर, तारामुंबरी सोसायटीचे विनायक प्रभू,देवगड फिशरमनचे द्विजकांत कोंयडे,उल्हास मणचेकर, सचिन कदम,उमेश कदम,जगन्नाथ कोयडें,संजय बांदेकर,अरुण तोरसकर,प्रसाद पराडकर, मच्छिमार संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा