You are currently viewing केंद्र सरकार : तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे कोरोनाची लागण

केंद्र सरकार : तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे कोरोनाची लागण

मुंबई :

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेकदा आदेश जारी केल्यानंतरही मार्च महिन्यात दिल्लीत तबलिगी जमातने कार्यक्रमाचे आयोजन केले. यामुळे अनेक लोकांना व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती, केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.
मार्चमध्ये दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरातील एका मशिदीत तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने शेकडो परदेशी आणि स्थानिक लोकांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे दिल्ली व इतर राज्यात कोरोना पसरला का ? या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या रिपोर्टनुसार कोव्हिड-19 च्या उद्रेकानंतर विविध अधिकाऱ्यांकडून अनेकदा गाईडलाईन्स आणि आदेश जारी करण्यात आले होते.
त्यावेळी कोणत्याही सोशल डिस्टेंसिंगचे पालन झाले नाही व मास्क, सॅनिटायझर देखील वापरले नाही. त्यामुळे अनेकांना व्हायरसची लागण झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा