जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
मनं … मनं .. भिजले ..
आधी होते एकले….
मन …मन .. भिजले…
स्पर्श संचिताचा झाला
मुखी रामनाम आले ….
मनं .. मनं .. भिजले …
बीज राम नामाचे…
खूप फळा पहा आले…
मनं ..मनं.. भिजले…
पूर्व पुण्याईचे धन
सांगा लुटणार कोण…
हात पेरीतच गेले …
जोडा जोडा जोडा धन
स्वच्छ ठेवा पहा मनं
राम नाम घेत गेले….
बीज वाढतच गेले
अवघे विश्वच व्यापले
राम रहावया आले …
मन.. मन .. भिजले …
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)