You are currently viewing नकळत

नकळत

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांची काव्यरचना

नकळत सारे घडले कधी कसे मला न कळले
वेडे मन तुझ्यात गुंतले मनास ना माझ्या कळले

हसत हसत मी पिया तुझ्याच रे जवळी आले
आठवूनी क्षण आज माझ्या मनाने मलाच छळले

पकड तुझ्या हाताची सख्या जेव्हा पडली सैल
विचार तुझाच करून एकदा होते मागे मी वळले

जीव तुला लावला होता मी जीवापेक्षा जास्त
तू दिलेल्या दुःखांना होते मी आनंदाने गिळले

चुका तू करतानाही मी दुर्लक्षच करत राहिले
खोटे आरोप देखील तुझे मी हसत हसत टाळले

चंदन उगाळूनही बोटांना वास ना उरला होता
श्रेय न घेण्याचे तंत्र मीच कटाक्षाने होते पाळले

सत्कर्म करूनही कधी गर्व न मजला झाला
नावं ठेवणारे उगाच सत्कार्यच पाहून जळले

टिका निंदा नालस्ती लोक कर्तृत्वाचीच करतात
टीकाकारांना शब्दरसाच्या कढईत होते मी तळले

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग, ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा