प्रगतीपथ एज्यु- फाऊंडेशन संस्थेकडून गवाणे हायस्कूलला चार संगणक संच प्रदान
तळेरे
शिक्षणामुळे माणुस प्रगल्भ होतो , ज्ञान देण्याचे काम शाळेत केले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्थांना संगणकाचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. गवाणे सारख्या ग्रामीण भागात असलेल्या प्रशालेतील शिक्षक ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करीत आहेत आणि त्यामुळेच शाळेची कौतुकास्पद प्रगती होत आहे असे प्रतिपादन तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे सहकार्यवाह चंद्रकांत उर्फ राजू जठार यांनी केले.
देवगड तालुक्यातील गवाणे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाला पुणे येथील प्रगतीपथ एज्युकेशनल फाऊंडेशन या संस्थेकडून अन्वित फाटक व विनोद महाजन यांंचे कडून चार संगणक संच देणगी म्हणुन मिळाले.ही देणगी मिळवून देण्यात राजू जठार यांंचे मोलाचे सहकार्य लाभले.याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणुन जठार बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गवाणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक तळेकर होते. याप्रसंगी संस्थापदाधिकारी गजानन राणे , प्रकाश तळेकर पालक प्रतिनिधी राजू माईणकर , प्रमोद कदम , देवगड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दिलीप घरपणकर , गवाणे शाळेचे मुख्याध्यापक अरुण पवार , शिरवलीचे बोडके सर , प्रशालेचे मुख्याध्यापक ए. एच्. मुल्ला , चिञकार अक्षय मेस्ञी , पञकार गुरु सावंंत इ.मान्यवर उपस्थित होते. यावेळी अशोक तळेकर यांंचे हस्ते जठार यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तालुका मुख्याध्यापक संंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घरपणकर यांचा ही सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष अशोक तळेकर यांनी प्रगतीपथ ट्रस्टकडून मिळालेल्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष घरपणकर यांनी आजच्या तंञज्ञानाच्या युगात संगणक ज्ञानाचे महत्त्व मोठे असून सर्वांनी संगणक साक्षर होण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात मुख्याध्यापक मुल्ला सरांंनी प्रशालेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.संगणक संच दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करुन या संगणकांचा उपयोग आमचे विद्यार्थी नवनवीन ज्ञान घेण्यासाठी करतील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सुञसंंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रशालेचे शिक्षक ए. आर. रुणकर यांनी केले.