जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य ज्येष्ठ कवी, गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना
( चाल :ने मजसी ने परत मातृभूमीला)
ही कविता नासाने चंद्र आकसत चाललाय असा शोध लावल्याच्या बातमी वर कविता करावयाची रिक्वेस्ट होति त्या साठि लिहिली होती )
हे सत्य नसे तरिही प्रश्न कां पडला?
चंद्रमा असा का रुसला?
किति कवितांची पाने तुज अर्पियली
प्रेमे प्रतिमा स्पर्शियलि
किती वर्षे रे तुझ्या कलां तच रमली
पोर्णिमा वयाची सरली
कां स्तब्ध आता मी राहू रे?
नि:श्ब्द असा तुज पाहू रे?
वेदना कुणाला वाहू रे?
जो हर्षभरे उजळविल सत्याला
चंद्रमा असा कां रुसला?
जो आज वरी सॊंदर्य देवता ठरला
किति उपमांनि गॊरविला
हा डाग नसे तीट तुला लावियला
दृष्ट की न लागो तुजला
का आज असा अंतरशि रे?
संकोच वृथा कां करिशी रे?
आलिप्त पणा पांघरशी रे?
रोहिणी सवे ये पुन्हा प्रीत साक्षीला
चंद्रमा असा कां रुसला?
*अरविंद*