देवगड
देवगड तालुक्यात दोन ठिकाणी झाडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. या दोन्ही घटनांची माहिती मिळताच देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
दाभोळे तेलीवाडी येथील सुधाकर राजाराम निरोमकर वय 54 राहणार दाभोळे तेलीवाडी हे सकाळी ९:३० च्या सुमारास दाभोळे गवळदेव नजीक असलेल्या बागेत नारळ काढण्यासाठी माडावर चढत होते.माडावर चढत असताना त्यांचा हात सुटून माडावरून ते जमिनीवर खाली पडले.यात त्यांच्या हाताला व बरगड्यांना दुखापत झाली तसेच रक्तस्राव झाला.या घटनेची माहिती बाळकृष्ण राजाराम निरोमकर 72 दाभोळे तेलीवाडी यांनी देवगड पोलिसांना दिली.सुधाकर यांना उपचारासाठी तात्काळ नातेवाईकांनी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.मात्र देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी ते मृत असल्याचे घोषित केले. याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे उदय शिरगावकर करत आहेत.
माडावरून पडून मृत्यू झाल्याची दुसरी घटना:-
दाभोळे पाटथर येथील चंद्रकांत भगवान सावंत वय 50 हे इळये पाटथर येथील सुहासिनी गणपत कदम (45) यांच्या बागेतील माडाच्या झाडावरील नारळ काढण्यासाठी गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास चढले होते. माडावरील नारळ काढून ते माडावरून खाली उतरत असताना हात सुटून ते माडावरून जमिनीवर पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली तसेच मोठ्या प्रमाणात झाला. त्यांना उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणले असता देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी ते मृत असल्याचे घोषित केले या घटनेची माहिती सुवासिनी कदम यांनी देवगड पोलिसात दिली असून याबाबतचा अधिक तपास उदय शिरगावकर करत आहेत.