सिंधुदुर्गनगरी
सन 2020-21 करिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाचे नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण करण्यासाठी दिनांक 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.
ज्या विजाभज,इमाव व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाही.अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावित. जिल्हयातील सर्व महाविद्यांलयानी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन 31 ऑक्टोंबर 2021 अखेर लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण या कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आवाहन श्री. दीपक घाटे यांनी केले आहे