लेख सादर: अहमद मुंडे
धोक्याची जाणीव करून देण्यासाठी दिली जाते त्याला हाक म्हणलं जात. हाक हा शब्द खेडेगावातील आहे पण आज सर्व भागात या शब्दाची गरज भासली आहे. आज. विविध योजनांच्या नावाखाली होणारी लूट. विविध पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी लुट. रेशनकार्ड काढून देण्यासाठी लुट. दवाखान्यात डॉ कडून रुग्णांची लुट. पेट्रोल डिझेल दरवाढ. घरगुती गॅस दरवाढ. भरमसाठ विज बिल. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचीही पठाणी पध्दतीने मालमत्ता कर वसुली. बॅका पतसंस्था यांचें मनमानी व्याज. गावातील शहरातील विकास कामे गटर बगीचे स्मशानभूमी समाजभूमी रस्ते. यामध्ये लाखो रूपयांचा अपहार. महिला सुरक्षा अभाव. महिलांना मिळणारी वागणूक. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यामध्ये फी चे नावाखाली पालकांची लुट. बस सेवा प्रवाशांची लुट. घरकुल घोटाळा. अपंग कल्याण योजनांचा बाजार. सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या. वाढती गुन्हेगारी. आत्महत्या प्रमाण. राजकीय दबाव. विविध हक्कांना तिलांजली. अशा एक नाही अनेक प्रश्नांवर विचार करण्यासाठी व तुम्हाला जाग करण्यासाठी # हाक दिली आहे. #
भारतातील आरोग्याचा प्रश्न हा अनेक घटकांवर अवलंबून आहे. प्रामुख्याने. गरिबी. दारिद्र्य. बेरोजगारी. रेशन घोटाळा. रेशन दुकानदार आणि पुरवठा अधिकारी व कर्मचारी सगणमत. जागोजागी भ्रष्टाचार. पैशाची उकाळणी. लोकशाहीचा अभाव. अशा विविध घटकाशी निगडित आहे. अफाट दारिद्र्य आणि बेरोजगारी यांनी देशातील 60/टक्के पेक्षा अधिक लोकांना पोटभर एकावेळचे अन्न मिळत नाही. आणि ज्यांना मिळते त्यांचाही आहार. चौरस. संतुलित व पोषणमूल्य युक्त असत नाही. जीवनसतवाचा अभावी अनेक व्यक्तिंना कोणते ना कोणते तरि भयानक आजार असतताच. सर्वसामान्य भारतीय माणसाच्या आहारात प्रथिनाचा अभाव असतो. गोरगरीबांना दुध फळे सकस आहार मिळत नाही. त्यांच्या अन्नपदार्थांत पालेभाज्या व इतर भाज्यांचा समावेश नाही या कारणांमुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुल कुपोषणाचे बळी होतात. शारीरिक मानसिक वाढ नाही. त्यांची कार्यशक्ती पूरेशी नाही. एवढेच काय काही ठिकाणी पिण्यास स्वच्छ व वर्षभर पाणी सुध्दा उपलब्ध नाही. यामुळे याभागात साथीचे आजार रोग झपाट्याने पसरतात आणि गावच्या गावं बाधित होतात.
आरोग्याची काळजी आणि औषधांचा वापर याबाबत भारतामध्ये पुरातन परंपरा आहे. ग्रामीण भागामध्ये रांनपाला वनस्पती आणि गावठी औषधांचा वापर केला जातो. व त्या विषयांचे ज्ञान एका पिढिकडून दुसऱ्या पिढीकडे येते. या ज्ञानाचे आत्ता आयुर्वेदिक औषधां मध्ये झालेलेच दिसते. पूर्वी राजदरबारी राजवैध असत आणि सामान्य लोकांसाठी इतर वैद्यांची मदत मिळत असे. मुघल साम्राज्याच्या उदयाबरोबर युनानी औषध उपचार पद्धती काही ठिकाणी लोकप्रिय झाली. अनेक ठिकाणी हकिम अशा प्रकारचीं औषधयोजना करीत असत. म्हणजे पूर्वी औषध उपचार समाजसेवा आणि रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा म्हणून केली जात असे. माणूस वाचला पाहिजे पैशांची अशा नव्हती आज या वैद्यकीय पेशाचा पैसा मिळविण्यासाठी बाजार मांडला आहे. कोणताही नियम नाही. कोणतेही उपचार दर निश्चित नाही. औषधांचे दर निश्चित नाही.
ब्रिटिश आगमनानंतर ख्रिश्चन मिशनरयानी पाश्चात्य अॅलोपथी. चिकित्सक प्रसार सुरू केला व ही पध्दती लवकरच म्हणजे कमी वेळात लोकप्रिय झाली. त्यामुळे आयुर्वेदिक आणि युनानी चिकित्सा पद्धती मागे पडल्या. सामान्य आणि स्वस्त रितीने मिळणारी औषधांची सोय रितीने मागे पडली महात्मा गांधी याचे मर्म ओळखून निसर्गोपचार. योग आणि शाकाहारी यांचा प्रसार सुरू केला. म्हणजे ब्रिटिशांनी सुरवातीला आपणांस वेगवेगळ्या पध्दतीने लुटले आणि नंतर मुळालाच हात घातला तो म्हणजे वैद्यकीय साधने औषध नावाखाली लुटले त्यात अजून बदल झाला नाही ती लुट आज आपलेच परकियांच्या संगनमताने सर्वसामान्य जनतेला लुटत आहेत
ब्रिटिशांनी साधारणपणे जिल्ह्याच्या ठिकाणी नागरि रूग्णालयाची इस्पितळाची निर्मिती करून आरोग्याची सोय पहिल्यांदा केली. स्वातंत्र्यानंतर काळात ग्रामपातळी पर्यंत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्याची योजना आखण्यात आली. तरिही आज भारतात सर्वत्र सुलभ आणि गोरगरीब जनतेला परवडणारया खर्चात औषधोपचाराची सेवा उपलब्ध झालेली नाही त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे आपल्यातील आरोग्य सेवेचा बाजार. शासकिय योजना विमा कंपन्या यांचेकडे वर्ग करणे. महात्मा फुले जन आरोग्य योजना. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य. पंतप्रधान आयुष्मान आरोग्य योजना. या फक्त नावालाच आहेत त्यांची मक्तेदारी ठराविक राजकीय दवाखाने यांनाच देण्यात आली आहे. याबाबतची भारतातील परस्थिती अंत्यंत मागासलेल्या देशा सारखीच आहे. याचा अर्थ देशांमध्ये उत्तम वैद्यकीय तज्ञ. शल्यविशारद यांची कमतरता आहे असे नाही. केरळ किंवा पंजाब सारख्या देशात वैद्यकीय सेवा अधिक चांगल्या रितीने उपलब्ध आहेत तर उत्तर प्रदेश. बिहार. मध्य प्रदेश. राजस्थान या राज्यात वैद्यकीय सेवेचा दर्जा निकृष्ट आहे असे म्हणता येईल 1960 नंतर आरोग्य क्षेत्रात कार्य करणार्या स्वयंपूर्ण संघटनांची वाढ होऊ लागली. आज देशात सर्वसाधारण पणे 5000 स्वयंस्फूर्तीने काम करणार्या संघटना वैद्यकीय क्षेत्रात कार्य करीत आहेत. अनेकदा या संस्था युनियन संघटना वैद्यकीय उपचार किंवा आरोग्य सेवा शिबिरे. कान. नाक. घसा. तसेच नेत्रचिकितसा इत्यादी सर्वसामान्य जनतेसाठी गोरगरीब लोकांसाठी शिबिरे भरवली जातात. यांतच कुटुंब कल्याण शिबिरांचे आयोजन केले जाते. अलीकडेचया काळात काही डॉ संघटना याबाबतीत जाणीवपूर्वक सहभाग घ्यावयास सुरुवात केली आहे. धार्मिक तसेच सामाजिक संघटना या क्षेत्रात अविरतपणे काम करताना आपण बघतो. .
आरोग्य सेवेच्या क्षेत्रात अनेक संघटना जरी कार्य करीत असल्या तरी अजूनही त्या एकत्रित कार्य करू राजकीय दबावामुळे शकत नाहीत. त्यामुळे शासकीय धोरणांवर त्याचा पाहिजे त्या प्रमाणात परिणाम होत नाही. विविध विचार प्रणाली. विविध पक्षाचा दबाव. विचार मत भिननता. या क्षेत्रात कार्य करीत असल्याने त्यांच्यात एक वाकयता होणे कठीण आहे. केरला शास्त्र साहित्य परिषद नाव या संदर्भात अपवादात्मक म्हणून सांगता येईल. सामान्य माणसापर्यंत प्राथमिक स्वरुपाचे वैद्यकीय ज्ञान नेण्याचा संघटनेने जाणिवपूर्वक प्रयत्न केला आहे. मद्यपान. धूम्रपान. व इतर अमली पदार्थ याबाबतची वयसनता बाबतीतील व्यसनाधीनता भारतीय समाजात विशेषत युवकवरगामधये. आज वाढत आहे. काही संघटनांनी मोठ्या मोठ्या शहरांत व्यसन मुक्ती याबाबत मोहीम उघडली आहे. परंतु अखेरीला आरोग्य प्रश्न हा सामाजिक व आर्थिक न्यायाच्या प्रशनाशी निगडित असल्याची व्यापक जाणीव समाजामध्ये निर्माण झाल्याखेरीज या संघटना. सेवाभावी संस्था युनियन समाजसेवक यांच्या प्रयत्न अपुरे पडतील
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859