कुडाळ :
पर्यटन संचालनालय (DoT) महाराष्ट्र व प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई आणि ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय यांच्यामार्फत 22 ऑक्टोबर 2021 शुक्रवार* रोजी ठिक *सकाळी 11 वाजता ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय, पिंगुळी गुढीपुर ता. कुडाळ* येथे* पर्यटन कार्यशाळा* आयोजित करण्यात आली आहे.
कोकणातील कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी आणि हॉटेल रिसॉर्ट यांना औद्योगिक दर्जाची नोदणी कार्यपद्धती आणि त्याचे फायदे तसेच इतर पर्यटन योजना बाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
येथे पर्यटन योजना बाबत माहिती देण्यासाठी
*श्री. हनुमंत हेडे* उपसंचालक (पर्यटन) प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई *पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे* TAKA कोकण कल्चर पार्क कृषी पर्यटन केंद्र *श्री. मनोज हाडवळे* पर्यटन प्रशिक्षक पर्यटन संचालनालय *श्री. संजय नाईक* प्रमुख समन्वयक तथा संचालक निसर्ग पर्यटन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यशाळा नोंदणी साठी *श्री. चेतन गंगावणे* मो.नंबर. 9987653909 / 9270743136 याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.