You are currently viewing वैभववाडीत 22 रोजी शेतकरी परिसंवादचे आयोजन

वैभववाडीत 22 रोजी शेतकरी परिसंवादचे आयोजन

कै विवेकानंद नाईक वैभव कृषीभूषण पुरस्काराचे होणार वितरण

वैभववाडी

स्वर्गीय विवेकानंद नाईक यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार दि. 22 ऑक्टोबर रोजी विवेकानंद नाईक वैभव कृषीभूषण पुरस्कार व शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात संपन्न होणार आहे.
मंडळ कृषी अधिकारी विवेकानंद नाईक यांनी बारा वर्षे वैभववाडी तालुक्‍यात प्रामाणिक काम केले. अनेक आंबा, काजू बागायतदारांना त्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. या शिवाय शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.

तालुक्यात झालेल्या काजू क्रांतीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. गेल्या वर्षी त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रवण फार्मर कंपनीच्या वतीने प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी रमेश राजाराम गुरव रा. कोकिसरे यांना विवेकानंद नाईक वैभव कृषीभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नाईक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन महेश संसारे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा