You are currently viewing बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा ने केली कोरोनावर मात

बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा ने केली कोरोनावर मात

मुंबई प्रतिनिधी

सप्टेंबरला अभिनेत्री मलायका अरोरा हिला करणाची लागण झाली होती.आत्ता तिने कोरोना वर मात केली आहे. आज एक फोटो शेयर करत इंस्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. विवारी मलायकाने चेहऱ्यावर मास्क आणि हातात कॉफीचा कप घेऊन फोटो शेयर केला आहे. त्यासोबत तिने गेल्या १५ दिवसांतील आपले अनुभव सांगितले आहेत. मलायका म्हणाली, अखेर कित्येक दिवसांनी मी माझ्या खोलीमधून बाहेर आले आहे. हे म्हणजे स्वतःमध्येच एक प्रवास केल्यासारखे आहे. कमीत कमी वेदना आणि समस्यांसह मी कोरोनावर मात केली आहे. तसेच वारंवार मार्गदर्शन करणारे पालिका कर्मचारी, सल्ला देणारे डॉक्टर आणि आधार देणारे कुटुंबीय यांचेही तिने आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा