कणकवली
कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत एकूण ८७ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली . संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉ. प्रथमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी सदस्य सचिव तथा तहसीलदार आर.जे. पवार, संजय गांधी योजना नायब तहसीलदार तानाजी रासम, नगरपंचायत मुख्याधिकारी अवधुत तावडे, नायब तहसीलदार उत्तम तांबे, संजय गांधी योजना समिती सदस्य स्वरूपा विखाळे, सुरेश रांबाडे, प्रविण वरूणकर, रुपेश जाधव, प्रदीप सावंत, अव्वल कारकुन श्रीमती आय. एच. पेडणेकर, बी. आर. जाधव, श्रीमती ए. ए. बागवे आदी उपस्थित होते.
यावेळी संजय गांधी निराधार योजना ५६, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना गट अ ८, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना गट ब १३, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ८, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना १ व इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजना १ अशा ८७ एवढ्या प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.