You are currently viewing मालाड चे नगरसेवक अजित रावराणे यांना पितृशोक

मालाड चे नगरसेवक अजित रावराणे यांना पितृशोक

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी स्वस्थानी जाऊन घेतली भेट

मालाड चे नगरसेवक अजित रावराणे यांचे वडील
आबासाहेब रावराणे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. श्री.आबाराव या नावाने त्यांचा लोरे २ मध्ये दबदबा होता. ते वैभववाडी तालुक्याचे सभापती होते. अत्यंत मनमिळाळु असा त्यांचा स्वभाव होता. बाबा नाडकर्णी, बाबा पटेल, भाऊ पटेल या सर्व जेष्ठ मंडळींनी गावाच्या विकासात केव्हाही राजकारण आणले नाही. मरावे, परी किर्ती रुपी उरावे! अश्या घाटनीची ही माणस. आत्ताच्या सर्व राजकारण्यानी हा बोध घेणं गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सांगितले. फोंडाघाट मध्येही त्यांच्या कामाचे योगदान मोठे होते. आबांच्या योगदानातुन वैभववाडी तालुक्यातही बरेच उपक्रम राबविले गेले. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी मुंबईला अजित रावराणे यांची भेट घेवुन भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा