जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य ज्येष्ठ कवी, गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना
कोजागिरी कोजागिरी आम्हा कविंची जहागिरि
तो पॊर्णिमेचा चंद्रमा जणु नांदतो आमुच्या घरी
वाटे कधि मज कींव ,त्यांचि येतसे आणी दया
असता मिठीतच स्वप्रिया ज्यांना सुचे ना शायरी
मी सांगतो पुसतात जेंव्हा हा डाग कां चंद्रावरी
खूण ओठांची विसरते कधी रोहीणी गालावरी
बीज प्रमाचे रुजावे अंकूर कवितांचेत्या फुटावे
लुटण्यास प्रणयगंधा हवी शब्दातली जादूगरि
कांही म्हणा हा कविंचा जन्मसिद्धच हक्क की
मानि जो ती पुष्पशय्या जरि झोपला कांट्यावरि
प्रेमात कधि रमतात सारे विरही व्यथा ना साहति
जिंदादिली कविची जपे जखमाही त्या अंगावरी
चंद्र आकाश पुष्प आहे फुलते कधी कोमेजतेही
पण हृदयी कविच्या स्थान ते अढळ त्या ध्रूवा परी
अरविंद