जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांची कोजागरी पौर्णिमेसाठी लिहिलेली काव्यरचना
कोजागरीचा हा चंद्रमा
येतो तेज लेवूनी भाळी
उजळूनी टाकतो नभ
उजागर ही रात्र काळी
बहर आला चांदण्याला
प्रेमात आसमंत न्हाला
कोजागरी पौर्णिमेला
चंद्र हा प्रियकर भासला
चांदणे शरदाचे फुलले
भेटीस चंद्रमा आतुरले
उमलता प्रित ही हृदयी
गाली चांदणे गोड हासले
भाव मनीचा तो हळवा
हृदया चंद्राच्या भावला
उत्कट प्रेम दाटता भेटी
चंद्र कोजागरीस धावला
हसरी चांदणी पाहूनी राती
प्रित मनामनात खुलते
भेट सखीची होताची
तन मन आनंदे डुलते
©{दिपी}✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६