महिला सक्षमीकरणासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याची दिली ग्वाही
कॉयर बोर्ड उपविभागीय कार्यालय ओरोस मार्फत कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथे महिलांसाठी काथ्या प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. प्रशिक्षणातील महिलांना उद्योग धंद्यात प्रोत्साहित करण्यासाठी रविवारी आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट दिली. महिलांनी काथ्या पासून बनविलेल्या वस्तूंची पाहणी करत महिलांचे कौतुक केले.
जिल्ह्यातील महिला सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली. यावेळी जि. प. सदस्य नागेंद्र परब, हिर्लोक सरपंच कन्याश्री मेस्त्री,उपसरपंच नरेंद्र राणे, कुडाळ आत्मा कमिटी सदस्या स्नेहा दळवी आदी उपस्थित होते.