जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रा.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना
असला कुठला आलाय प्राणी
गावा बाहेरच्या वेशीवर
चटक चांदणी आहेस तु ग
उत्तर देशील बरोबर ।। ध्रु ।।
समद्या जगाची झोप उडाली
घरदार बंद झाली र
तोंडावरती मास्क बांधुनी
घराबाहेर हिंडत्यात र
घराबाहेर येता जाता
हात साबणाने धुत्यात र
बोलताना ठेवत्यात अंतर
सोशल डिस्टन्स म्हणत्यात र
सर्दी पडस आले तरी बा
घश्यात बोळा फिरवत्यात र
खडूस प्राणी त्यात दिसला
वाळीत त्याला टाकट्यात र
काय सांगु इथली परिस्थिती
माणुस घरी अन प्राणी बाहेर
चटकचंदणी म्हणुन सांगते
कोरोना ह्याला म्हणत्यात र
प्रो डॉ प्रवीण ( जी आर) जोशी
अंकली बेळगांव