जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत संपूर्ण गोपाळनगरवासीयांनी केला प्रवेश
राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा पुढाकार
कणकवली
फोंडा घाट जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गोपाळ समाजातील शेकडो समाज बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. सातत्याने विविध पक्षाच्या नेत्यांकडून फसवणुकीला बळी पडलेल्या या समाजाच्या प्रगतीसाठी किंबहुना सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून यापुढील काळात सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत, असे आश्वासन यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी दिले आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात केवळ या भागातील मतांवर डोळा ठेवून असलेल्या अनेक नेत्यांना या प्रवेशातून मोठी चपराक बसली आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अमित सामंत पुढे म्हणालेत महाविकास आघाडीचे सरकार आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तुमच्या व्यवसायाच्या आड कोणी येत असेल त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी मी उभा असेन. पक्षाच्या माध्यमातून आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करताना तुमच्या मुलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. केवळ परंपरागत गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा तुमची मुले सरकारी अधिकारी पदाच्या खुर्चीत बसवीत यासाठी आम्ही मार्गदर्शन करू. केवळ मतांसाठी आम्ही तुमच्याकडे पाहत नाही तर तुमचा सर्वांगीण विकास आम्हाला करायचा आहे. असेही ते म्हणाले. जिल्हा बँकेच्या माध्यमातूनही विविध आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, आज जिल्हा बँक आमच्या ताब्यात आहे तशीच ती आगामी काळातही आमच्याकडेच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी दिनेश भिकाजी होळकर, कृष्णा धोंडू निकम, नितेश अर्जुन गजबार, रवींद्र हनुमंत होळकर, संतोष हनुमंत चव्हाण, मंगेश वसंत निकम, अजित बारक्या गजबार, सागर होळकर, सुरेश लवू निकम, महेश भिकाजी होळकर, अभिजित भिकाजी निकम, प्रकाश चेत्तार, लक्ष्मण धोंडू निकम, अनंत देवजी गजबार, अरुण बापू निकम यांच्या सोबतीने शेकडो गोपाळ बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळ बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे काय आहे ? असा प्रश्न विचारणाऱ्यांना ही सणसणीत चपराक आहे. आगामी काळात अनेक लोक पक्षात यायला इच्छुक असून त्यांचे अशाच पद्धतीने भव्य प्रवेश घेतले जातील, असेही ते म्हणाले. या मतदारसंघांमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करत असताना कोणीही या पक्ष कार्यामध्ये आडवे आल्यास त्यालाही मात देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. राज्यात आमचे सरकार आहे त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळवून देताना कोणताही प्रसंग असो मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य विनोद मार्गज, कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुंदर पारकर, युवक राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली तालुका युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सागर वारंग, कणकवली शहर अध्यक्ष संदेश मयेकर, कृषी सेल तालुकाध्यक्ष चंद्रकांत नाईक, निखिल गोवेकर, अजय जाधव, अन्वर साठी, वैभव सावंत, विनोद डगरे, सखाराम हुंबे, सेनापती सावंत, उत्तम तेली आदी उपस्थित होते.