*प्रख्यात कवयित्री, गझलाकार कविता काळे, पुणे यांची अप्रतिम गझल*
*– वात —*
बा भिमाची लेखणी ही काळजाच्या आत आहे,
अंध झाल्या या युगा मी पेटलेली वात आहे.
धर्म मोठा धर्म छोटा भारताच्या भूवरी का ?
फक्त येथे त्या मनूने मांडलेला घात आहे.
वेगळ्या नात्यात मी रे बांधले आहे तुला पण,
रक्त आहे लाल मग का वेगळी ही जात आहे.
ना कुणाशी वैर माझे ना कुणाशी वाद आहे,
लेक आहे मी रमाची रामजीची नात आहे.
दाखल्यावर माणसाचा धर्म कळतो आपला पण,
एकतेचा देत नारा आज ‘कविता’ गात आहे….
© कविता काळे.
मांजरी, हडपसर पुणे
पिन.412307
Contact no.7507736519