आचार्य इंस्टिट्यूट् ऑफ संस्कृत अॅण्ड योग ,सिंधुदुर्ग कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर शुक्र. दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी बांदेकर बिल्डिंग , सालईवाड़ा-सावंतवाडी येथे सम्पन्न झाला.
सद्गुरु प्रार्थना, गणेश पूजनाने सोहळा प्रारम्भ झाला. उद्घाटन समारंभास सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळ – सचिव श्री.हरिश्चंद्र मांजरेकर तसेच राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी गोपाळजी,माँगेली- दोडामार्गचे माजी सरपंच सूर्यनारायणजी , तसेच आचार्य इंस्टिट्यूट्चे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
श्री. हरिश्चंद्र मांजरेकरजी यांनी याप्रसंगी आचार्य इंस्टिट्यूट्च्या सर्वपदाधिकाऱ्यांसहित वेदमूर्ती आचार्य हरिश्चन्द्रजी यांना संस्कृतकार्याबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
आचार्य इंस्टिट्यूट् द्वारे ८वी, ९वी, १०वीत संस्कृत विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत प्रशिक्षण, तसेच संस्कृत प्रचारार्थ संस्कृत, बालबोध, आरोग्यासाठी योग वर्ग, आदि उपक्रम सावंतवाडीत सुरु असून २०० हून अधिक विद्यार्थी ऑनलाइन वर्गाच्या माध्यमातून संस्कृतभाषा आत्मसात करीत आहे. जिल्ह्यातील सर्व संस्कृत प्रेमिंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी गोपाळजी यांनी केले.