You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीला पुन्हा एकदा उच्च न्यायालयाची स्थगिती…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीला पुन्हा एकदा उच्च न्यायालयाची स्थगिती…

सिंधुदुर्ग

सगळ्यांचे डोळे लागून राहिलेल्या बहुचर्चित सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीला पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मतदार यादीतून नाव डावलल्यामुळे उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात मतदानाचा हक्क मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. त्यामुळे राज्यभरातील काही जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया थांबली होती. त्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा देखील समावेश होता. आज उच्च न्यायालयात यावर न्याय निवडा होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होईल अशी शक्यता होती. साहजिकच सर्वांचा लक्ष निवडणूक कार्यक्रमावर लागला होता. मात्र, आज उच्च न्यायालयात यावर न्याय निवाडा झाला नाही. जोपर्यंत न्याय निवाडा होत नाही, तोपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर करु नये. असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सहकार प्राधिकरणला दिला. या आदेशामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी हाती घेतला होता पण, तो आता रद्द केलाय अशी माहिती प्रांताधिकारी वंदना करमाळे यांनी दिली. दरम्यान, दोन दिवसात याचिकेवर निर्णय होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा