जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक,कवी श्री. मुबारक उमरानी यांची अप्रतिम काव्यरचना.
पाषाणाच्या श्रमफलावर
फुलत राहे फिनिक्स फुल
पाषाणा फुटते पाझर
हसत राहे घामातले शुल
वाळूतल्या तेलातील धारा
श्रमफुला भिजवती चिंब
कण कण नभ घन वाजे
वीज प्रकाशातील ते थेंब
पाषाण पा़षाणातून उभे
पहाडावरी सुंदर बंगले
नागमोडी श्रम वाटेवरी
पत्थरावरी ही फुल रंगले
बंजर माळावरी हसे जिद्द
इवल्या इवल्या फुला कसे
कांट्याच्या राशीतली पाने
मन माझे तेथे फुलात फसे
सागराच्या चंचल लाटा त्या
ओळीत पळे किणा-याकडे
सवे घेत चंचल चपल वीज
श्रमघर्मावर शिंपी फुल सडे
©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०७१०९७.