जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
शिवबाची ती महान माता नाव सांगते जिजा
बहाल केला महाराष्ट्राला नाव शिवाजी राजा
पराक्रमाचे धडे गिरवले बाल हाती समशेर
पुण्यभूमी नांगरे जिजाऊ बाल शिवाजी थोर…
चंद्र सूर्य आहेत जोवरी जिजाऊ राहिल नाव
जाधवांची कन्या शोभे शिंदखेड राजा गाव
गढीवरी वाढली जिजाऊ राजघराणे थोर
रणांगणाचे धडे गिरवले फिरवली समशेर …
बाल शिवाजी घेऊन हाती आली पुण्यनगरीत
बाळकडू पाजलेच होते अंगाईतूनच गात
कथा विरांच्या शूरांच्या अन् रामायण भारत
बालपणी स्फुल्लिंग पेटले पाळण्यात रक्तात ..
सदरेवरती स्वत: जाऊनी रयतेस दिला न्याय
धीराची ती सौदामिनी हो पुण्यवंत पाय
वळण लाविले राजाला नि सोबत प्रजेलाही
वचकून होती बाजूची ती राज्ये पहा शाही…
शहाजीची ती राणी शोभली माता महाराष्ट्राची
थोर आहे महती सतीची जननी जिजाऊची …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)