You are currently viewing बॉल ऑफ द सेंच्युरी..

बॉल ऑफ द सेंच्युरी..

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ असून सध्या टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला. ज्यानंतर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 4 विकेट्सने विजयी झाला. दरम्यान सामना भारताने गमावला, पण सामन्यात भारतीय गोलंदाज शिखा पांडे हीने फेकलेल्या एका चेंडूने मात्र भारतीय महिला क्रिकेटचं नाव जगभरात मोठं केलं.

सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर शिखाने ऑस्ट्रेलीयाच्या सलामीवीर एलिसा हीलीला त्रिफळाचित केलं. ऐकायला जरी ही सामन्य विकेट वाटत असली तरी ज्याप्रकारे हा चेंडू फेकण्यात आला आणि स्विंग झाला ते पाहून चांगल्या चांगल्यांचे डोळे फिरतील. अनेकांनी तर या डिलेव्हरीला महिला क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट डिलेव्हरी असल्याचंही म्हटलं आहे. अनेकांनी या डिलेव्हरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत त्याचं कौतुक केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा