कणकवली
कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी अवधुत तावडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या 8 व 9 ऑक्टोबरला च्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला व दुसऱ्या डोस नगरपंचायत बहुउद्देशीय हॉल मध्ये देण्यात आला. या लसीकरणाचा लाभ कणकवलीतील तब्बल 493 हूनअधिक नागरिकांनी घेतला असून 12 ऑक्टोबर ला पुन्हा नगरपंचायत प्रशासनाकडून लसीकरणाची विशेष मोहीम आयोजित केल्याचे मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी सांगितले आहे
सध्या कणकवली शहरातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे या उद्देशाने नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला असून 8 ऑक्टोबर 238 नागरिकांना तर 9 ऑक्टोबर ला 255 जनांनी लसीकरनाचा लाभ घेतला आहे व 12 ऑक्टोबरला पुन्हा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणन जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे 8 व 9 ऑक्टोबर या दिवशी तब्बल 493 जणांनि या लसीकरणचा लाभ घेतला आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे , आरोग्य परी सेविका नैना मुसळे, नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक नगर पंचायत कर्मचारी सतीश कांबळे,प्रतिष खैरे, प्रवीण गायकवाड, संदीप मुसळे ,महेश राणे ,राठोड, उपस्थित होते पुढे आणखी काही दिवस असेच लसीकरण सुरू राहिले तर कणकवली शहरातील लसीकरण पूर्ण हिण्याची शक्यता वर्तवली जात आहे