You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील तिथवली लसीकरण केंद्राला डब्लु.एच.ओचा अभिप्राय…

वैभववाडी तालुक्यातील तिथवली लसीकरण केंद्राला डब्लु.एच.ओचा अभिप्राय…

वैभववाडी

जागतिक आरोग्य संघटना(डब्लूएचओ) यांनी वैभववाडी तालुक्यातील तिथवली कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन पहाणी केल्यावर अवघ्या देशात हे केंद्र अव्वल असल्याचे म्हटले आहे. तसा लेखी अभिप्राय दिला आहे. त्याचबरोबर या लसीकेंद्रात काम करणाऱ्या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली आहे.

वैभववाडी तालुक्यासारख्या खडतर अशा तिथवली गावातील आरोग्य उपकेंद्रातील कोविड लसीकरण केंद्राला शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटना(डब्लूएचओचे) मुकेश कुमार जोशी, डब्लूएचओ एक्सटर्नल माँनिटर यांच्या पथकाने भेट दिली. त्यावेळी लसीकरण सुरु होते.

तेथील सुविधा, स्वच्छता, व्यवस्था, कोविड संदर्भात पाळले जाणारे नियम लाभार्थीना मिळत असलेली वागणूक आणि मदत या सर्व बाबी काटेकोर पणे पाळल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले आहे. कोणतीही यात त्रुटी दिसली नाही असे म्हटले आहे. आता पर्यंत अनेक कोविड सेंटरला भेटी दिल्या पण अशी व्यवस्था कुठे दिसली नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच उपकेंद्रातील उपस्थित आरोग्य कर्मचारी किर्ती गायकवाड(सीएचओ), निलिमा कुळकर्णी (एएनएम )जितेंद्र गौरखेडे (एमपीडब्लू )यांना सेशन विषयी माहिती वजा प्रश्न विचारले गेले. त्यांनी या पथकाला समाधानकारक उत्तरे दिली. त्यानंतर तिथवली हे उपकेंद्र हे वाखाणण्याजोगे असून भारतात एक नंबर आहे असा पेनाने या पथकाने अभिप्राय लिहून येथील व्यवस्थेबाबत व कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खडतर अशा तिथवली आरोग्य उपकेंद्राचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा