You are currently viewing एअर इंडिया आता टाटा समूहाच्या ताब्यात

एअर इंडिया आता टाटा समूहाच्या ताब्यात

केंद्र सरकारकडून शिक्‍कामोर्तब

सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडियामधील निर्गुंतवणुकीसाठी चार कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. यातील सर्वाधिक गुंतवणुकीची टाटा समूहाने लावलेली बोली मंजूर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.

एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटदेखील स्पर्धेत होते. यामध्ये टाटा सन्सने बाजी मारली असून एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे गेली आहे.

एअर इंडियाची सुरुवात 1932 मध्ये टाटा समुहानेच केली होती. टाटा समुहाचे जे. आर. डी.टाटा यांनी याची सुरुवात केली होती. 1947 ला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एका राष्ट्रीय एअरलाईन्सची गरज भासू लागली आणि सरकारने एअर इंडियाची 49 टक्के भागिदारी खरेदी केली. 1953 सरकारने एअर कार्पोरेशन अॅक्टअंतर्गत एअर इंडियाची 100 टक्के भागिदारी खरेदी केली आणि एअर इंडिया सरकारी कंपनी झाली.

गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअर इंडियावरील कर्जाचा बोजा सतत वाढत आहे. एअर इंडियावर 38 हजार 366 कोटी रुपयांचे कर्ज आहे. सरकारी खात्याने एअर इंडियाचे 500 कोटी रुपये थकवले आहेत. तसेच एअर इंडियाकडे एकूण 46 हजार कोटी रुपयांची संपत्ती असून यात जमीन, इमारतींचा समावेश आहे.

तोटा वाढत चालल्याने मागील 20 वर्षांपासून एअर इंडिया विकण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यावेळी 20 टक्के भाग विकण्याचा प्रयत्न होता. मात्र सरकारी अटी आणि कर्जामुळे डुबलेल्या एअर इंडियाला खरेदीसाठी कुणी पुढे येत नव्हते. तसेच 2017 मध्ये 74 टक्के भाग विकण्याचा विचार करण्यात आला होता. पुढे पूर्ण 100 टक्के कंपनी विकण्याचे निश्चित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा