जात पडताळणी कार्यालयात आ. वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा
जात पडताळणी प्रमाणपत्रां संदर्भात विद्यार्थी, नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आज सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या ओरोस येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे (जात पडताळणी कार्यालयात) आढावा घेतला. जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग चे उपायुक्त प्रमोद जाधव, संशोधन अधिकारी दीपक घाटे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढून नागरिकांना सर्वोतपरी सहकार्य करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या.
जात पडताळणी प्रमाणपत्रां संदर्भात अडचणी असलेले अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते त्यांच्या अडचणी अधिकऱ्यांसमक्ष जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागरीकांच्या अडचणी बाबत दोन ते चार महिन्यांनी आढावा बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
हि प्रमाणपत्रे लवकरात लवकर मिळावी यासाठी तहसीलदार प्रातांधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे कुडाळ अध्यक्ष अतुल बंगे, राजू गवंडे, अँड. नानू देसाई, दिगंबर तवटे, प्रवीण भोगटे, पंकज सादये आदींसह नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.