अष्टाक्षरी रचना
आदिशक्ती दुर्गादेवी
तूचि पार्वती शिवाची
विष्णू लक्ष्मी दुजारूप
पत्नी सावित्री ब्रम्हाची
नऊरूपे शक्ती प्रबळ
अष्टभुजा शस्त्रधारी
शांती समृद्धी देऊनी
नाश शक्तींचा आसुरी
सिंहावर स्वार माता
महिषासुर संहारी
शताक्षीचे रूप घेता
नाव मिळे शाकंभरी
सिद्धपीठ ज्योतिर्लिंग
जिथे स्थापना दुर्गेची
कामाख्या तू महाकाली
नावे अनेक देवीची
वेद पुराण रक्षण
पडे दुष्टांवर भारी
शैलपुत्री हिमकन्या
आद्यदिनी पूजा करी
©(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६