सिंधुदुर्गनगरी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक ७ ऑक्टोंबर २०२१ ते ८ ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता पाली येथून मोटारीने चिपी विमानतळ सिंधुदुर्गकडे प्रयाण . रात्री 8 वाजता आगमन व चिपी विमानतळ येथे आढावा बैठक स्थळ :चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला .रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह वेंगुर्ला येथे आगमन व राखीव.
शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता आगमन व चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राखीव,स्थळ: चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग, दुपारी 1 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्ग बाबत आढावा बैठक. स्थळ : तहसिल कार्यालय, वेंगुर्ला ,दुपारी 2 वाजता महाविकास आघाडी समन्वय समिती सभा स्थळ: फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.दुपारी 4 वाजता वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने भटवाडी वेशी येथे स्वागत कमानीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: वेंगुर्ला नगरपालिका कार्यक्षेत्र, वेंगुर्ला . दुपारी 4.15 वाजता वेंगुर्ला नगरपरिषदेने नव्याने साकारलेल्या कवी मंगेश पाडगांवकर बालोद्यानच्या लोकर्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: कॅम्प, वेंगुर्ला.सायंकाळी 4.30 वाजता नगरपरिषदेने नुतनीकरण केलेल्या मानसीश्वर उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता नगरपरिषदेने पर्यटन निधीतून साकारलेल्या दिपगृहकडे जाणाऱ्या पादचारी मार्गाच्या लोकर्पण सोहळ्यास उपस्थिती.स्थळ: वेंगुर्ला बंदर वेंगुर्ला . सायंकाळी 5.15 वाजता नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती, स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह वेंगुर्ला. सायंकाळी 6.00 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने आजगांव ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सायंकाळी 6.30 वाजता श्री. स्वप्निल आजगांवकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ :आजगांव, ता. सावंतवाडी. सोईनुसार आजगांव येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण . रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव.