सर्व पुरावे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या हाती कोरोनाच्या काळामध्ये, प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे, एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागला होता व सदर तोटा भरून काढायला एसटी प्रशासनाने एसटी च्या प्रवासी वाहतूकीच्या गाड्या या कोट्यावधी रुपये खर्च करून मालवाहतूक करण्याजोग बनवून त्याचा वापर मालवाहतूक करण्याकरता वापरात आणल्या, पण या संपूर्ण गाड्या या बेकायदेशीररित्या संपूर्ण महाराष्ट्रात चालवल्या जात आहेत आणि त्याची खात्रीलायक बातमी तसे पुरावे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या हाती लागले आहेत. व हे सर्व पुरावे घेऊन लवकरच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे देण्यात येणार आहे. तसेच असल्या मालवाहतूक गाड्या ह्या रस्त्यावर चालवण्याच्या परिस्थितीमध्ये नसून, त्यामध्ये भविष्यात अपघात होण्याचे दाट शक्यता नाकारता येत नाहीं व अशा मुळे चालकाचा जीव हा भविष्यात धोक्यात आहे व असे झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना गप्प बसणार नाही व जे जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कायदेशीर ज्या ज्या कारवाया करता येतील त्या त्या केल्या जाणार असल्याचा इशारा नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.