*पराक्रमी सती ….*
नऊ रात्रीची नऊ रूपे ही दुर्गेची असती
असंख्य झाल्या भारत भूमी मध्ये पहा सती
महेश्वरला अहिल्या देवी झाली राज्यकर्ती
जागोजागी खुणा तिच्या हो जागोजागी स्मृती
किल्ले वाडे विहिरी बांधल्या,न्यायप्रिय होती
रस्तोरस्ती झाडे लाविली पाणपोया किती
तलवारीवर घट्ट पकड ती,राखिले हो राज्य
नवऱ्याची ना साथ तरी ही मानिले ना त्याज…
नर्मदे तटी त्या अजुन दिसती वैभवाच्या खुणा
चांदवडच्या रंगमहाली रेणुकेचा बाणा
स्री शक्तीचे उत्तम आहे पहा उदाहरणं
पाय धरावे असे सतीचे अहिल्येचे चरण….
संकटातूनी किती त्या गेली किती होरपळली
कौटुंबिक दु:ख्खात तावून सुलाखून उरली
सुख न मिळाले जीवनात हो खरी सती होती
दहशत होती शत्रूंना हो मनातून भीती ….
वैभव दिसते पराक्रम हो दिसे रेवा तीरी
दुर्गा होती परक्रमी ती सात्विक हो नारी ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)