You are currently viewing अन्यथा उपोषणाला बसणार : भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रमोद जठार

अन्यथा उपोषणाला बसणार : भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रमोद जठार

रत्नागिरी :

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण व कोव्हीड रूग्णांच्या कक्षाकडे आरोग्य यंत्रणे बरोबर राज्यकर्ते व जिल्ह्या प्रशासनाचे रुग्णांकडे दुर्लक्ष आहे. शासनाच्या कोविड केअर सेंटर मध्ये सुविधांची अनास्था झाली आहे. आठ दिवसांत सर्व सुविधा सुधारा अन्यथा उपोषणाला बसण्याचा ईशारा भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रविवारी घेतलेल्या माहितीत गेल्या २४ तासांत ९४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,६९९ वर पोहोचली आहे. आज चिपळूण २, संगमेश्वर २,  खेड २, गुहागर १, रत्नागिरी १ अशा ८ रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या २१७ झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा ,जिल्हा प्रशासन व राज्यकर्ते काय करतात? असा प्रश्न पडला आहे. वाढलेली रुग्णसंख्या व मृतांची आकडेवारी पाहता अधिकारी व
सत्ताधारी हेच सर्वजण याला जबाबदार आहेत अशी टिका प्रमोद जठार यांनी केली आहे.

यात रूग्णांची हेळसांड, सुविधांच्या उणीवा आणि अयोग्य नियोजनामुळे कोरोना संसर्ग वाढला आहे. जिल्हातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा फक्त दिखावूपणा केला जात आहे. याचमुळे आरोग्याच्या सुविधांचे तीनतेरा वाजल्याने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. येत्या आठ दिवसांत सर्व सुविधा सुधारा अन्यथा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू व दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.दीपक पटवर्धन यांच्यासह भाजपा पदाधिकारी समवेत उपोषणाला बसण्याचा ईशारा भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यानी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा