You are currently viewing माणगाव तंटामुक्ती अध्यक्ष पदी माजी सरपंच सचिन धुरी यांची निवड..

माणगाव तंटामुक्ती अध्यक्ष पदी माजी सरपंच सचिन धुरी यांची निवड..

कुडाळ :

माणगाव ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्राम सभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पदी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.प. सदस्य श्री सचिन धुरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यापूर्वी तीन वेळा त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडल्यामुळे माणगाव चौथ्या वेळी सचिन धुरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.त्यांच्यात कालावधीत यापूर्वी माणगाव गाव तंटामुक्त करून शासनाचे ७५००००/- लाखाचे बक्षीस माणगांव ग्रामपंचायतीला मिळवून दिले होते. या निवडी बद्दल त्यांचे माणगाव मधून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी माजी वित्त बांधकाम सभापती सगुण धुरी, सरपंच जोसेप डाॅन्टस, दिपक कानेकर, वैभव परब, योगश धुरी, सुनिल सावंत ,आपा मुंज,ग्रामसेवक कोलते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा