You are currently viewing उद्योजक प्रवीण शिरसाट यांचेकडून बांदा शाळेला कचरा कुंड्या भेट

उद्योजक प्रवीण शिरसाट यांचेकडून बांदा शाळेला कचरा कुंड्या भेट

बांदा

बांद्यातील प्रसिध्द उद्योजक प्रवीण श्रीकृष्ण शिससाट यांनी आपल्या ५०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा केंद्रशाळेसाठी तीन कचराकुंड्या भेट दिल्या व मुलांना खाऊचे वाटप केले.
प्रवीण शिरसाट हे सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असतात यावर्षी त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला कचराकुंडया भेट दिल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण गावडे, सनिल धामापूरकर, ग्रामपंचायत सदस्या रिया आल्मेडा, मुख्याध्यापक सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रंगनाथ परब, जे.डी. पाटील उपस्थित होते.
बांदा शाळेसाठी आवश्यक असलेल्या कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रवीण शिरसाट यांचे शाळा व्यवस्थापन समिती व बांदा ग्रामसथांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा