You are currently viewing हॅश टॅग मैत्री..

हॅश टॅग मैत्री..

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्या विख्यात अभिनेत्री, मॉडेल, बियोंड सेक्स या गाजलेल्या पुस्तकाच्या लेखिका सोनल गोडबोले यांचा लेख.

प्रत्येक व्यक्तीनुसार तिचा स्वभाव.. दोघेही एकमेकाना मिस करतात. प्रत्येक क्षणी काही प्रसंगी ज्या ठिकाणी ते दोघे गेलेत किवा त्यांनी एकत्र घालवलेले क्षण असतील किवा कॉफी कधी ड्रींक तर कधी डिनर तर कधी शॉपिंग ही असेल.. दोघांचे स्वभाव भिन्न असत्तात पण तरीही दोघे एकमेकांना आवडतात..
अशा काही गोष्टी घडतात की दोघांचे एकमेकांशी बोलणे थांबते. संवाद थांबला कीं नाती संपतात. हे त्या दोघांनाही माहीत आहे पण तरीही मी का बोलावं , मी फोन केला तर तो किवा ती उचलेल का?? .. किवा मीच का बोलु किवा काय बोलु असे अनेक प्रश्न नात्यात येतात आणि अबोला धरुन नात्यांचे दरवाजे बंद होतात..काहीतरी निमित्त काढुन त्याना एकमेकांशी बोलायचं असतं पण मधे येतोच.. एक महिन्याच्या अबोल्यानंतर तिने न रहावुन मेसेज केलाच.. पण असं जेव्हा घडतं तेव्हा दरवेळी तिच मेसेज किवा फोन करते. म्हणजे पुन्हा तोच प्रश्न की तिलाच एकटीला मैत्रीची किवा मित्राची गरज आहे. सोडुन दिलं तर ती त्याच्या मित्राला गमावणार असते. खूपदा त्याला फोन करायला म्हणून फोन हातात घेतला आणि तसाच ठेवुन दिला..आज त्याचा वाढदिवस म्हणुन तिने निमित्त साधलं आणि बोलायचं असं ठरवलं.. अहंकार नको राग नको फक्त तिला तिचा मित्र हवा होता.. आपली मैत्रीण फक्त आपलीच असावी असं वाटणं योग्यच आहे पण तिने कोणाशी मैत्री करु नये किवा कोणासोबत कुठे जाऊ नये हे वाटणं तिच्या स्वभावाला आणि तिच्या व्यवसायाला न पटणारं होतं.. फुलपाखरासारखी बागडणारी तिचे पंख छाटल्यावर तिची प्रगती थांबणार हे त्याच्या मनाला आणि त्या वयोगटाला समजायलाच हवं होतं. जन्माला एकटेच येतो.. जाताना एकटेच जातो पण आपल्याला माणसे लागतात हे जितकं खरं तितकीच त्यांची मैत्रीही खरी.. कभी खुशी कभी गम या आयुष्याच्या वाटेवर काही गोष्टी विसरुन एक पाऊल पुढे टाकुन मैत्री केली तर ती आयुष्यभर टिकते हेच खरं.. तिनेही तेच केले जे सगळ्यानी करावे..

सोनल गोडबोले
लेखिका.. बियॉन्ड सेक्स

प्रतिक्रिया व्यक्त करा