जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूह सदस्य श्री मुबारक उमरानी यांची तमासगीर कलावंतांची व्यथा मांडणारी हृदयद्रावक लावणी
पायी घुंगरू बांधले की होते मी बेभान
सख्या रंगात रंगू द्या इश्काच विडापान! !धृ! !
हे गाव ते गाव फिरले समदा भारत
घुंगरामुळे मिळाली गावा गावात चाहत
रक्ताळल्या पायाकडं,नका देऊ ध्यान!!१!!
ढोलकी वाजताच मी नाचते रंगमंची
नाचतांना अंग अंगी भिजते कंचुकी
अहो राया, इस्काचा नका सोडू बाण! !२!!
शिट्ट्या ,पैका,समद्यांच्या नजरा झेलते
लावणीतनं सारं सारं मन माझं खोलते
राया मनमंदीरी ,तुम्ही ठेवा माझा मान! !३!”
©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७