सावंतवाडी
तळागाळातील जनतेला न्याय मिळावा म्हणून सतत लढणारा, सामान्य ग्रामस्थांच्या सुखदुःखात त्यांच्या सोबत असणारा एक संवेदनशील राजकीय, सामाजिक नेता कार्यकर्ता आज काळाच्या पडद्याआड गेला.
असं संघर्षवादी, सह्रदयी नेतृत्व जाणं हे कुडाळ तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण जनतेचं मोठं नुकसान आहे. अशा शब्दात काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष आबा मुंज यांना शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.