You are currently viewing अंधार

अंधार

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तिविकास मंच सदस्य दीपक पटेकर यांची काव्यरचना

काळोखाने आयुष्यात अस्तित्व दाखवले नसते
उजेडाचे कधी कोणाला महत्व कळले नसते

सुख उपभोगत जीवन हसत खेळत जगले
दुःखाला आठवतं का कुणी उराशी कवटाळले
सुख दुःख जीवनाची अंग, दुःख क्रूर भासते
उजेडाचे कधी कोणाला महत्व कळले नसते

हार-जीत दोन्ही बाजू एकाच नाण्याच्या
शब्दांपेक्षा पैशाला किंमत दुकानात वाण्याच्या
पैसा श्रेष्ठ तिथे माणसाचे मोल काय असते
उजेडाचे कधी कोणाला महत्व कळले नसते

विसरू नयेत जुने दिवस ते कष्टात गेलेले
जगून घ्यावेत क्षण आनंदाचे वाट्यास आलेले
जाणीव भोगल्या दिवसांची क्षणोक्षणी त्रासते
उजेडाचे कधी कोणाला महत्व कळले नसते

©[दिपी]✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा