जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य डॉ. स्वप्निल चौधरी यांची रचना
सलग सेवा करुन निवृत्त झाल्यावर प्रत्येकाला पेंशन असत
तसं झाडांना असत तर..?
तर किती श्रीमंत असता शेतातला जुना आंबा,अन पारावरला म्हातारा वड..
झाडांच्या सेवेला पुरस्कारात मोजता आलं असतं तर?
पिंपळाला पद्मश्री,
चंदनाला झिजल्याबद्दल भारतरत्न,
अन बोरी, बाभळीलाही छोटा मोठा मिळालाच असता जीवनगौरव..!
औषधी झाडांना आरोग्य रत्न,
माती थोपवतात म्हणून पाणी फाऊंडेशनचा पुरस्कार,
ॲाक्सिजनसाठी जीवनरक्षक पुरस्कार,
पक्ष्यांच्या निवारा देता म्हणून पक्षी मित्र पुरस्कार,
किती किती मिळाले असते नाही
पुरस्कार..!
त्यांनाही घावाच्या जखमेच्या कविता लिहता आल्या असत्या ना,
तर,
प्रत्येक झाडाचा असता एक एक कविता संग्रह !
तुम्ही म्हणाल हा कवी मुर्ख आहे,
झाडं सजीवच असतात,
शिकला नसेल का हा पुस्तकात…!
अहो हो..!
पुस्तकात वाचलय..
पण झाडांचे रोज खुन होताय.
तरी त्याबद्दल कोणाला शिक्षा झाल्याचं ऐकण्यात नाही..!
म्हणून म्हटलं अहो,
झाडांना स-जीव समजलं असतं तर.!
कवी डाॅ स्वप्निल चौधरी
📞94202 57567
*एक झाड लावु आणि जगवु*
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱