जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य कवी कृष्णा आर्दड यांची काव्यरचना
स्वप्न हरवले रानामधले
*शब्द गोठले गाण्यामधले,*
*डोळे माझे रडू लागले*
*पिक पाहुनी पाण्यामधले…*
*राब राबूनी मातीमध्ये*
*मी कष्टाची पुजा केली,*
*सालभराची पुरी कमाई*
*पाण्यामध्ये वहात गेली…*
*कसे जगावे कसे मरावे,*
*लय हरवले जगण्यामधले*
*डोळे माझे रडू लागले,*
*पिक पाहुनी पाण्यामधले…*
*कापूस गेला सोयाबीन गेली*
*पुऱ्या कष्टाची माती झाली,*
*कुठून पदरी अशी अचानक*
*माझ्या दारी अवकळा आली….*
*जळतो आहे आतून आतून*
*अश्रू ढाळीत डोळ्यांमधले*
*डोळे माझे रडू लागले,*
*पिक पाहुनी पाण्यामधले…*
*तुझा हा जुल्मी अघात सारा*
*थांबव आता पाऊस राजा,*
*दु:खाला मिळताच किनारा*
*पुन्हा मुळावर गुलाब वारा…*
*दु:ख भयंकर कुठवर सोसू*
*घास हिरावले तोंडामधले*
*डोळे माझे रडू लागले,*
*पिक पाहुनी पाण्यामधले…*
😭😭😓😢😥😓😓
*कवी कृष्णा आर्दड*
*राजाटाकळी ता घनसावंगी जि जालना*
*मो 7410120335*