..उमेश गाळवणकर.
कुडाळ
कामावर निष्ठा ठेवा.निष्ठेचा मोबदला मिळतोच .निष्ठा जपा. त्याची किंमत पैशात करता येत नाही. ध्येयप्राप्तीसाठी पैसा साधन म्हणून वापरा.समाधान मिळेल.पैसा म्हणजे सर्वस्व नाही. असे उद्गार उमेश गाळवणकर यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै महिला बी.एड कॉलेजच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
“एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या न्यायाने विविध अभ्यासक्रमांच्या व्यक्तींनी एकोपा राखत एकमेकांना साथ देत पुढे जायचं आहे. जीवनाच्या वाटचालीमध्ये सुद्धा एकोपा हा यशस्वी ते कडे घेऊन जातो. त्यासाठी जिथे आपण काम करतो त्या संस्थेवर प्रेम करा .ती तुमच्यावर प्रेम करेल. असे सांगत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे पहिले शैक्षणिक अपत्य म्हणून बी.एड कॉलेज ची स्थापना हा आपल्या शैक्षणिक वाटचालीतील एक सुवर्ण क्षण आहे .त्याला विसरता येत नाही. नव्या आव्हानांना सामोरे जात नव्या जोमाने प्रयत्न करून ध्येय प्राप्तीसाठी झटण्यात खरा आनंद आहे.. असे सांगत बीएड अभ्यासक्रमा ची गुणवत्ता चांगली असल्यामुळे राज्यातील काना कोपऱ्यातून महिला आपल्याकडे ऍडमिशन घेऊन चांगल्या पद्धतीने यश संपादन करून पुढे गेलेले आहेत. तीच गुणवत्ता आपण टिकविली आहे .यामुळे आपल्या बी.एड कॉलेजचे एक वेगळं नाव झालेलं आहे. याचे श्रेय सर्व प्राध्यापक व कर्मचारी, हितचिंतक आहे. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे हा विविध अभ्यासक्रम सुरू करण्यामागचा आमचा हेतू असल्याचे सांगत काळाची पावले ओळखत आपण अशीच वाटचाल करत राहूया; जेणेकरून लोकांच्या शैक्षणिक गरजा आपल्या जिल्ह्यात पूर्ण करता येतील. यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभारी प्राचार्य परेश धावडे यांनीसुद्धा “विशिष्ट तत्त्व घेऊन जाणारी ही शिक्षण संस्था असून बी. एडमध्ये सगळ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी व चांगले दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असल्याचे सांगत उत्तम नाव असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या या महाविद्यालया च्या वाटचालीचे आपण साक्षीदार असल्याचा अभिमान आहे. असे सांगून शुभेच्छा दिल्या. तर प्रा नितीन बांबर्डेकर यांनी शिक्षण संस्थेच्या वाटचालीतील संस्थाचालकांचे योगदान ,शिक्षकांचे योगदान व उत्तम शैक्षणिक दर्जा याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,आभार व सूत्रसंचालन प्रा अरुण मर्गज यांनी केले.यावेळी बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी, फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या डॉक्टर शेटकर,प्रा.वैशाली ओटवणेकर व विविध अभ्यासक्रमाचे प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.