पुनाळ/प्रतिनिधी:-
स्वातंत्र्य दिनाचे रौप्य महोत्सवी या दिनाचे औचित्य साधून लयभारी साहित्य समूह यांच्या वतीने आॕनलाईन काव्य स्पर्धा व ई बुक प्रकाशन सोहळा जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रा मध्ये येथील वरिष्ठ पोलीस पदाधिकारी यांच्या हस्ते मोठ्या दमदार सोहळ्यात कोरोनाचे नियमांचे पालन करुन संपन्न झाले.
खाकी वर्दीशी निगडित आणि देशभक्ती या विषयावर स्पर्धा आणि इ बुक सोहळा साहित्यिक मा . गजानन दराडे पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना , मा. प्राचार्य साहेब मा. अभय डोंगरे , Api जगन्नाथ नारायण फुलवाडकर , Api मधुरा भास्कर पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना , मुंबई पोलीस कवयित्री पद्मावती मॅथाईस , आधुनिक बहिणाबाई कवयित्री विमलताई माळी , ज्येष्ठ कवी / गझलकार मा. हेमंत रत्नपारखी , पत्रकार खंडू भोसले , पत्रकार किशोर बन्सोड या मान्यवरांच्या उपस्थित भव्यदिव्य सोहळा संपन्न . या कार्यक्रमासाठी कवयित्री मा. विद्या माने, कवी मा. संतोष रायबान यांनी शुभेच्छा दिल्या.
*मरणाची भीती तेव्हाच मेली*
*जेव्हा चढविली अंगावर वर्दी*
*तिरंग्यात लपेटून शव येता*
*सलाम करण्या वर्दीला झाली गर्दी*
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक , गुजरात या राज्यातून स्पर्धकांनी आपल्या कविता पाठवल्या . या सर्व सारस्वतांनी आपल्या कवितेतून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली . तर पोलीस सेवेत रूजू असणाऱ्या , आणि सीमेवर भारत मातेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून , ऊन वारा , पाऊस , दिवस , रात्र यांची भीती न बाळगता आपल्या कार्यास वाहून घेणाऱ्या अशा सर्वांसाठी , अगदी अंतःकरणातून कविता लिहल्या . या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून साहित्यिक मा. गजानन दराडे पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना हे लाभले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ मा.अनिता नागे / पाठे जालना , उत्कृष्ठ मा. रुकसाना मुल्ला निपाणी कर्नाटक , प्रथम मा. छाया ब्रम्हवंशी गोंदिया , द्वितीय मा. विशाल पाटील वेरूळकर शेगाव अमरावती , तृतीय मा. अमर चौगुले निपाणी कर्नाटक , उत्तेजनार्थ मा. उज्वला दिघे , मा. गीतांजली सटाणेकर, मा. रुपाली पाटील, मा. आशिष नाईक, प्रांजली काळबेंडे या स्पर्धकांनी बाजी मारली. ८९ कवी कवयित्री सहभागी होते. या स्पर्धेचे आयोजन मा. अनिल केंगार, मा. प्रमोद सूर्यवंशी, मा. धनंजय माने, मा. रंजना मांगले यांनी केले. या समूहाचे नेहमीच कौतुक होत असते. कारण हा समूहाचा प्रत्येकवेळी नवीन काहीतरी करण्याचा मानस असतो. २६ जानेवारी २०२१ ला खाकी वर्दी ह्या विषयावर स्पर्धा घेतल्या. त्यावेळी परिक्षक कवी मा. संतोष रायबान सर लाभले. समूहाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून , पाखरांची शाळा ही अष्टाक्षरी स्पर्धा घेतली. त्यावेळी परिक्षक ज्येष्ठ साहित्यिक मा. हेमंत रत्नपारखी लाभले. कोरोनामुळे आषाढी वारी बंद आहे. हे लक्षात घेता आषाढी वारी निमित्त अभंग , गवळणी , वारी विषयी कविता असा उपक्रम राबवून, आलेल्या कवितांचे इ बुक बनवले. आणि त्याच दिवशी ऑनलाईन झूम कवी संमेलन घेतले.