*जागतिक पर्यटन दिवस २७ सप्टेंबर*
*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्या विविध पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री/लेखिका ज्योत्स्ना तानवडे यांची “जागतिक पर्यटन दिनाचे” औचित्य साधून लिहिलेली काव्यरचना*
ट्रिप ट्रिप ट्रिप, जणू
रोजच्या जगण्यावर मिळालेली टीप ||
कुणा हवे धार्मिक स्थळ, कुणी म्हणे नदी घाट
कुणा हवे किल्लेदुर्ग कुणी म्हणे सागरीकाठ ||
ठिकाण ठरवताना होतो काथ्याकूट
एकमत होताच बूक करतात सूट ||
सामान जमविण्यासाठी होते धावाधाव
नव्या नव्या बेतांची गाडी सुटते भरधाव ||
हळू हळू जमतात सगळे उत्साहाने भारलेले
मस्तीभऱ्या कल्पनांचे मनात ईमले बांधलेले ||
गप्पा गाणी गोष्टींनी आनंद सगळीकडे फैलावतो
हास्याच्या लकेरीबरोबर ताणतणाव सैलावतो ||
ऑफिस असो वा घरकाम घाण्याला जुंपल्यासारखे होते
एकसुरीपणातून ट्रीपमुळे थोडीशी सुटका होते ||
बदलामुळे फ्रेश होऊन प्रत्येक जण परततो
पुढच्या ट्रिपचा बेत आखतच गाडीतून उतरतो ||
मनुष्य असो की निसर्ग चैतन्याची उधळण हवी
पुन्हा नव्याने फुलण्यासाठी
ट्रिप हवीच हवी
ट्रिप हवीच हवी ||
ज्योत्स्ना तानवडे. पुणे